अण्णांच्या ४३ प्रत्रांना मोदींनी उत्तर दिलं नाही, पुन्हा लिहिलं पत्र

34

सामना प्रतिनिधी । नगर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. आपण उपोषणाला का बसणार आहोत या बाबत या पत्रात लिहिले आहे. आतापर्यंत पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना ४३ पत्रं पाठवून देखील त्यांनी एकही उत्तर दिले नाही, लोकपाल व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन सुरू करणार असून हे बेमुदत आंदोलन असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात सांगितले आहे.

गिरीश महाजन यांची शिष्टाई निष्फळ ठरली असून अण्णांनी आपल्या मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी केली. अधिवेशनात कोणते विधेयक मांडणार ते आगोदर सांगा असं बजावलं. वेळ कमी पडत असल्यास अधिवेशनचा कालावधी वाढवावा. आता चर्चा नाही तर ठोस निर्णय घ्या, असंही अण्णांनी सुनावलं.

येत्या २३ मार्च रोजी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर आंदोलन होणार असल्याचं यावेळी अण्णांनी निक्षून सांगितलं.

anna-leter

आपली प्रतिक्रिया द्या