पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा 7 मार्चला, मोदींचे संकेत

पश्चिम बंगालसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा 7 मार्चला केली जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तसे संकेत दिले.

आसामच्या धेमाजी जिह्यातील सिलापाथर येथील एका सभेमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मागच्या वेळी 2016 मध्ये विधानसभा निवडणुका 4 मार्च रोजी जाहीर झाल्या होत्या. यावर्षी निवडणुक आयोग 7 मार्च रोजी निवडणुका जाहीर करेल असा माझा अंदाज आहे.’

निवडणुकांची घोषणा करणे निवडणुक आयोगावर अवलंबून आहे पण दरम्यान लवकरात लवकर आपण आसाम, पश्चिम बंगाल, पुडूचेरी, तामिळनाडू आणि केरळचा दौरा करणार आहोत असेही मोदी यावेळी म्हणाले. याच पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या