नवीन होंडा सिटी लाँच, जनरेशन 5 अधिक आकर्षक

हिंदुस्थानमधील प्रीमियम कार मधील अग्रेसर निर्माती कंपनी होंडा कार्स इंडिया लिमीटेड (HCIL), ने आज बहुप्रतिक्षित नवीन 5 व्या जनरेशनची होंडा सिटी लाँच केली आहे. जानेवारी 1998 मध्ये देशातमध्ये पहिल्यांदाच लाँच झालेली, होंडा सिटी देशातील सर्वात यशस्वी मध्यम आकाराची सिदान कार आहे. आता तिच्या 5 व्या जनरेशन मध्ये नवीन होंडा सिटीची संकल्पना तिचा वारसा पुढे नेला आहे.

हिंदुस्थान, आशियातील देश आणि इतर मार्केट मध्ये लोकांच्या ड्रायव्हींगच्या गरजा आणि जीवनशैलीचा सर्व्हे केल्यानंतर नवीन होंडा सिटी होंडाच्या आर अँड डी सेंटर जे तोचिगि, जपान येथे आहे त्याठिकाणी तयार करण्यात आली आहे.

स्टाइल, कनेक्टिव्हीटी, सुरक्षा आणि सुविधा यांसाठी ‘उद्योगात प्रथम’ आणि ‘सेगमेंट वैशिष्ट्यामध्ये उत्तम’ असलेली ही कार तीनही प्रकारात प्रमाणित आहे ज्यामुळे या सेगमेंट मध्ये नवीन बेंचमार्क तयार होतो.

नवीन सिटी 5 रंगांच्या प्रकारात उपलब्ध असेल – रेडिएंट रेड मेटॅलिक, प्लॅटिनम व्हाइट पर्ल, मॉडर्न स्टील मेटॅलिक, लुनार सिल्व्हर मेटॅलिक, गोल्डन ब्राउन मेटॅलिक.

आपली प्रतिक्रिया द्या