मेघालयः दोन दिवसांत काँग्रेसच्या ६ आमदारांचा राजीनामा

सामना ऑनलाईन । शिलाँग

मेघालयमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मेघालयचे माजी उपमुख्यमंत्री रोवेल लिंगदोह यांच्यासह काँग्रेसच्या ६ आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. युनायटेड डेमोक्रॅटिक पक्षाच्या एका आमदाराने तसेच दोन अपक्ष आमदारांनीही राजीनामा दिला आहे. या राजीनामा सत्रामुळे ६० सदस्यांच्या विधानसभेत आता ५१ जण उरले आहेत. काँग्रेसचे संख्याबळ ३० वरुन २४ वर आले आहे.

काँग्रेसच्या एका आमदाराने गुरुवारी तर पाच आमदारांनी शुक्रवारी राजीनामा दिला. युनायटेड डेमोक्रॅटिक पक्षाच्या एका आमदाराने तसेच दोन अपक्ष आमदारांनी शुक्रवारी राजीनामा दिला. शुक्रवारी राजीनामा देणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांमध्ये रोवेल लिंगदोह हे सर्वात मोठे नाव होते. राजीनामा देणारे आमदार नव्या वर्षात एका सभेदरम्यान नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षात सहभागी होणार आहेत.

विधानसभेचा कार्यकाळ

मेघालय विधानसभेचा कार्यकाळ ६ मार्च २०१८ रोजी संपणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या