हिंदुस्थानी वंशाच्या व्यापाऱ्याची अमेरिकेत हत्या

26

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

कन्सास येथे झालेली हिंदुस्थानी तरुणाच्या हत्येची घटना ताजी असतानाच अजून एका हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकाची अमेरिकेत हत्या करण्यात आली आहे. हर्नेश पटेल असं या नागरिकाचं नाव असून त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे.  गुरुवारी रात्रीच्या त्याची त्याच्याच दुकानाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दुकान बंद करून घराकडे निघत असतानाच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमुळे साउथ कॅरोलिना भागात जनक्षोभ उसळला आहे. पटेल हे अतिशय सभ्य आणि नेहमी मदत करण्यासाठी तत्पर असे गृहस्थ होते. ही हत्या देखील वांशिक वादातून झाली असावी असा संशय वर्तवण्यात येतोय, मात्र पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही. फेब्रुवारीच्या २२ तारखेला कन्सास येथे श्रीनिवास कुचिभोतला या हिंदुस्थानी तरुणाची हत्या करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या