शालेय राज्य किकबॉक्सिंग स्पर्धेत मुंबईच्या अंशिकाला कास्य पदक

40

सामना ऑनलाईन । शीव

जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथे नुकत्याच झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा आयोजित राज्यस्तरीय शालेय कुडो स्पर्धा २०१६-१७ स्पर्धेत शितो रियू स्पोर्टस् कराटे ऍण्ड किकबॉक्सिंग असोसिएशनच्या अंशिका बराई हिने चमकदार कामगिरी करत मुंबईकरिता वैयक्तिक कास्य व सांघिक गटात रौप्य पदकाची कमाई केली. तिला प्रशिक्षक उमेश ग. मुरकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. अंशिका ही शीव येथील अवरलेडी हायस्कूल येथे सहावीत आहे. शाळेचे प्रिन्सिपल फादर कार्लोस डायस यांनी तिचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा  दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या