दारू सोडवण्यासाठीची औषधे कोरोनाला रोखण्यासाठी उपयोगी

1157

कोरोनाला रोखण्यासाठी आता दारूचा नाद सोडविण्यासाठी वापरण्यात येणारी अनेक औषधे उपयोगी ठरणार आहेत. रशियन संशोधकांनी केलेल्या संशोधनात एक दिलासादायक निष्कर्ष काढण्यात आला आहे.

रशियन नेशनल रिसर्च यूनिव्हर्सिटी हायर स्कूल ऑफ इकोनॉमिक्सच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार कोरोना विषाणूची रचना एम -प्रोटीनने झाली आहे. या प्रोटीनला रोखण्यात दारू सोडविण्याची काही औषधे प्रभावी ठरू शकतात. अमेरिकन संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार दारू सोडवण्यासाठी वापरण्यात येणारे डीजुलफिरम हे औषध कोरोना विषाणूतील एम -प्रोटीनची वाढ रोखू शकते असे स्पष्ट झाले आहे. या शोधांमुळे कोरोना रोखण्यासाठी आता आणखी नवी औषधे मिळण्याचे संकेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या