दिल्लीतील दंगल भडकवण्याचे पाप शर्जिल इमामचेच; दिल्ली पोलिसांनी दाखल केले आरोपपत्र

460

नवी दिल्लीतील जामिया मिलिया आंदोलकांनी नागरिक सुधारणा कायद्याविरोधात (सीएए ) छेडलेल्या आंदोलनात 15 डिसेम्बरला हिंसाचार उसळला होता. जामिया न जीकच्या फ्रेंड्स कॉलनीजवळ उसळलेली ही दंगल शर्जिल इमामनेच आंदोलकांना भडकावल्यामुळे घडली असा थापक ठेवणारे आरोपपत्र दिल्ली पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात दाखल केले.
दिल्ली महानगर दंडाधिकारी गुरमोहन कौर  यांच्या न्यायालयात दिल्ली पोलिसांनी शर्जिलविरोधातील आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्डस् आणि 100हून अधिक साक्षीदारांच्या जबानीवरून दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. न्यायालयाने देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेल्या शर्जिल इमामला 3 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

फ्रेंड्स कॉलनी आंदोलनात मोठा हिंसाचार

15 डिसेम्बरला जामिया मिलिया इस्लामियानजीकच्या फ्रेंड्स कॉलनी आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर झालेल्या जाळपोळ,दगडफेक आणि लाठीमारात सीएएविरोधी आंदोलनातील विद्यार्थी आंदोलक, पोलीस आणि अग्निशमन जवानांसह 60 जण जखमी झाले होते. आंदोलकांनी 4 बसेस आणि पोलिसांच्या 2 व्हॅन पेटवल्या होत्या. त्यानंतर पोलीस आणि आंदोलकांत चकमक उडाली होती. हे आंदोलन भडकावण्यास विद्यार्थी नेता शर्जिल ईमामच कारणीभूत असल्याचा वहीम दिल्ली पोलिसांनी ठेवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या