स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर अँटी ड्रोन रडार सिस्टिम बसवणार

हिंदुस्थानसाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस असलेल्या 15 ऑगस्ट रोजीच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला आता आकाशातूनही संरक्षण मिळणार आहे. लाल किल्ला परिसरात अँटी ड्रोन रडार प्रणाली बसवली जाणार आहे.

या प्रणालीचं वैशिष्ट्य म्हणजे लाल किल्ला परिसरातील 4 किमी अंतरापर्यंत जर कुठलाही संशयास्पद ड्रोन दिसला तर त्याला तिथेच नष्ट केलं जाणार आहे. तसंच नॅनो म्हणजे छोट्या ड्रोनलाही ही प्रणाली सहज शोधू शकते. अगदी दोन किमी परिसरात आलेल्या नॅनो ड्रोनलाही पाडण्याची किमया या तंत्रज्ञानात आहे.

दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी शनिवारी आयोजित केलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रणालीच्या वापराचा घेण्यात आला आहे. या बैठकीत त्यांनी पोलीस दलाला विशेष सूचना दिल्या.

सामान्य जनतेमधील हालचालींवरही नजर ठेवा, दिल्लीच्या सीमांवर तपासणी आणखी कडक करा, तपासणीवेळी कुणालाही सूट देऊ नका, अशा सूचना अस्थाना यांनी केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या