नालासोपाऱ्यातून 1400 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

nalasopara-mumbai-police

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नालासोपारा परिसरातून 703 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जच्या मालाची किंमत सुमारे 1400 कोटी रुपये आहे. पाच अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी विभागाचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.