ऋषी कपूर, अब्दुल्ला देशद्रोही; वाराणसीत पोस्टर

सामना ऑनलाईन । वाराणसी

पाकिस्तान व्याप्त कश्मीर संदर्भात वादग्रस्त वटवट करणारे जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि अभिनेते ऋषी कपूर हे देशद्रोही आहेत, अशा आशयाचे अनेक पोस्टर वाराणसीत ठिकठिकाणी लागले आहेत. काही दिवसांपूर्वी फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तान व्याप्त कश्मीर संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. ‘पाकिस्तान व्याप्त कश्मीर पाकिस्तानचा आहे हिंदुस्थान तो कधीच परत घेऊ शकणार नाही’ असे फारुख अब्दुल्ला म्हणाले होते. अभिनेते ऋषी कपूर यांनी फारुख अब्दुल्ला यांचे समर्थन केले होते.

दरम्यान, फारुख अब्दुल्ला आणि ऋषी कपूर यांच्याविरोधात वाराणसीतील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. स्थानिक न्यायालयाने फारुख अब्दुल्ला आणि ऋषी कपूर यांच्याविरोधात याचिका दाखल करुन घेतली आहे. या याचिकेची सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या