भाजप नेत्यांकडून गोळ्या घालण्याची भाषा सुरुच, आणखी एका मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

389

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘गद्दारांना गोळ्या घातल्या पाहिजे’ असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता आणखी भाजप मंत्र्याने नागरिकत्व कायद्याविरोधात खोटी माहिती पसरविणाऱ्यांना गोळ्या घालण्याचे वक्तव्य केलं आहे. कर्नाटकमधील सांस्कृतिक व पर्यटन मंत्री सीटी रवी यांनी हे वक्तव्य केलं आहे. रवी यांनी याबाबत ट्विट केले आहे.

‘केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या देशद्रोह्याविरोधातील वक्तव्याला विरोध करणारे हे ते लोक आहेत जे अजमल कसाब व याकूब मेमन यासारख्या दहशतवाद्यांना फासावर लटकविण्याचा विरोध करणारे, तुकडे तुकडे गँगला पाठिंबा देणारे व सीएएबाबत खोटं पसरविणारे. अळशा देशद्रोह्यांना बिर्याणी देण्याऐवजी त्यांना गोळ्या घातल्या पाहिजे’, असे ट्विट रवी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या