मेहुल चोक्सीला दणका,ऑण्टिग्वाचे नागरिकत्व रद्द; हिंदुस्थानच्या हवाली करणार

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावणारा हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला आता आणखी एक दणका मिळाला आहे. तो ज्या देशात लपून बसला होता त्या एटिंग्वा-बारबुडाच्या पंतप्रधानांनी त्याचे नागरिकत्व रद्द करून त्याला हिंदुस्थानच्या हवाली करणार असल्याचे सांगितले.

पंतप्रधान गॅस्तन ब्राऊन यांनी याची माहिती दिली. ते म्हणाले ‘आम्ही कोणत्याही गुन्हेगाराला आमच्या देशात आश्रय देणार नाही. हिंदुस्थान आणि आमच्यात झालेल्या कराराचे पालन करत आहोत. चोक्सीची चौकशी सुरू आहे. चौकशी संपल्यावर त्याला हिंदुस्थानच्या हवाली करण्यात येईल.’ पीएनबी घोटाळय़ानंतर मेहुल चोक्सी एटिंग्वात पळला आणि नागरिकत्व घेतले. एटिंग्वातील न्यायालयात जुलै महिन्यात चोक्सीबाबत सुनावणी होणार आहे.