Video – लग्नापूर्वी सेक्स? अनुराग कश्यपचे मुलीला बोल्ड उत्तर

सतत काही ना काही वादात असणारा बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याने आपल्या युट्यूप चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनुरागची मुलगी आलिया वडिलांना अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारताना दिसतेय. आलियाने लग्नापासून ते लग्नाआधीच्या संभोगावरही वडिलांना प्रश्न विचारला आणि त्यांचे मत जाणून घेतले.

लग्नाआधी संभोग करण्यावर तुमचे काय मत आहे? या प्रश्नावर अनुरागने आलियाला तेवढेच बोल्ड उत्तर दिले. हा असा प्रश्न 80 च्या दशकात विचारला जात होता. आम्ही कॉलेजला असताना असे प्रश्न विचारत होतो आणि एकमेकांना उपदेश देण्याचा प्रयत्न करत होतो. आता आपल्याला पुढे वाटचाल करायला हवी, असे उत्तर अनुरागने दिले. या उत्तरावर आलियाने देखील लग्नाआधी संभोग करणे सध्या नॉर्मल असल्याचे म्हटले.

बॉयफ्रेंडचा मुंबईत मुक्काम

दरम्यान, आलियाचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयर याचा सध्या मुंबईत मुक्काम आहे. त्यामुळे आलियाने वडिल त्याच्याबाबत काय विचार करतात हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर शेन आपल्याला आवडत असून तो खूप अध्यात्मिक, शांत आहे. आपण जर वेगळ्या परिस्थितीचा विचार केल्यास त्याच्यात अशा अनेक क्वालिटी आहेत ज्या 40 वर्षाच्या पुरुषातही नसतात, असेही तो म्हणाला. तसेच मुलगी ज्या पद्धतीने मित्रांची निवड आणि मुलांची निवड करते यावरही आपण खूश असल्याचे तो म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या