अनुराग कश्यपवर शरीर संबंधासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप, प्रसिद्ध अभिनेत्रीने मागितली पीएम मोदींकडे मदत

बॉलीवूडमध्ये Me Too चळवळ पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. गेल्या महिन्यात चित्रपट निर्माते साजिद खान याच्यावर मॉडेलने गंभीर आरोप केले होते. आता निर्माता अनुराग कश्यप याच्यावर अभिनेत्री पायल घोष हिने गैरवर्तन लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. एका तेलगू न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने हा खुलासा केला असून ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे.

अभिनेत्री पायल घोष हिने आपली मुलाखत ट्विटरवर शेअर करत अनुरागवर आरोप केले आहेत. अनुराग कश्यप याने माझ्यासोबत गैरवर्तन केले, जबरदस्तीने लगट करण्याचा प्रयत्न केला.ल आणि वाईट वागणूक दिली. यावर कारवाई करा आणि या क्रिएटिव्ह माणसाच्या चेहऱ्यामागच्या राक्षसाला समोर आणा, असे आवाहन तिने पीएमओ, पंतप्रधान मोदी यांना केले. तसेच यामुळे माझे नुकसान होऊ शकते आणि माझा जीव देखील धोक्यात येऊ शकतो, कृपया मदत करा, असे आवाहनही पायल घोष हिने केले.

काय आहे प्रकरण?
तेलगू न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पायल घोष हिने ही घटना 2014 किंवा 2015 ला घडलेली असे सांगितले. त्यावेळी की खूप घाबरली होती त्यामुळे गप्प राहिली. एका कामाच्या संदर्भात अनुराग याला भेटायला गेले होते, मात्र त्याने रूममध्ये नेऊन माझ्यासोबत जबरदस्ती शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पायल घोष हिने केला. तसेच मी यासाठी तयार नसल्याचे त्याला सांगितले मात्र त्याने माझ्यासोबत काम केलेल्या सर्व अभिनेत्री फक्त एका फोनवर तयार होतात असे म्हटले. मात्र मी विरोध केला, असेही ती म्हणाली.

कोण आहे पायल घोष?
पायल घोष मूळची बांगला अभिनेत्री असून तिने कन्नड चित्रपटात काम केलेले आहे. बॉलिवूडमध्ये 2017 ला आलेल्या ‘पटेल की पंजाबी शादी’ या चित्रपटात तिने काम केले आहे. यासह तिने टीव्ही सिरीयल ‘साथ निभाना साथिया’मध्येही काम केलेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या