लगीन घाई? अनुष्का शर्माचं इटलीला प्रयाण…

78
अनुष्का शर्मा - अनुष्काने बंगळुरूच्या माऊंट कॉर्मेल कॉलेजमधून आर्टमध्ये ग्रॅज्यूएशनची डिग्री घेतली आहे. तसेच तिने एमए केले आहे.

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थान क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या संदर्भातील बातम्यांना अधिक बळकटी देणारी घटना काल घडली. अनुष्का शर्मा आणि तिच्या कुटुंबीयांनी गुरुवारी रात्री उशिरा इटलीचं विमान पकडलं. त्यांची देहबोली बघता ही घाई लग्नासाठीचीच असावी असा अंदाज बांधला जात आहे. मात्र अनुष्का आणि विराट यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

विराट आणि अनुष्काच्या लग्नाचा बँड इटलीत वाजणार अशा बातम्या आधीच पसरल्या होत्या. मात्र त्या अफवा असल्याचं नंतर सांगण्यात आलं. असं असलं तरी गुरुवारी रात्री उशिरा अनुष्का शर्मा आणि तिचे कुटुंबीय हे इटलीला जाण्यासाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. त्यामुळे पुन्हा एकदा या लव्ह बर्ड्सच्या बातम्यांना उधाण आलं आहे. अनुष्काला पत्रकारांनी प्रश्न केले मात्र ती एक शब्दही न बोलता विमानाच्या दिशेनं गेली. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामुळे आता साऱ्यांचं लक्ष विराट कोहली आणि इटलीकडे लागलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या