टीम इंडियाने अनुष्काला दिली नवी ओळख, कोणी ठेवलं खास नाव?

56

सामना ऑनलाईन । केपटाऊन

‘सुलतान’ चित्रपटात सुलतान सलमानच्या मित्रांवर चिडणारी ‘आरफा’ अनुष्का आठवली का? सलमानचे मित्र तिला भाभी म्हणतात आणि सलमानही त्याचं समर्थन करतो म्हणून आरफाच्या भूमिकेतील अनुष्का चिडून निघून जाते. याच अनुष्काला आता ‘भाभी’ नावाची सवय करून घ्यावी लागणार आहे. कारण टीम इंडियानं तिला ही नवी ओळख दिली आहे.

लग्न, रिसेप्शन आणि हनीमून झटपट आटोपून हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला आहे. अर्थात इथेही त्याची पत्नी अनुष्का शर्मा त्याच्यासोबत आहेच. ती टीम इंडियासोबतच दक्षिण आफ्रिकेला पोहोचली. अनुष्काला टीम इंडियाने आता ‘भाभी’ही ओळख दिली आहे. विरुष्काच्या रिसेप्शनमध्ये सहभागी झालेल्या युवराज सिंग याने तिला पहिल्यांदा भाभी म्हणून संबोधलं. रिसेप्शनचे फोटो पोस्ट करताना युवीनं तिला ही ओळख दिली. त्यामुळे टीम इंडिया तिला ‘भाभी’ म्हणून संबोधन करू लागल्याचं कळतं.

विशेष म्हणजे अनुष्कानं विराट आणि टीम इंडियासोबत प्रवास केला असं नाही तर तिच्या राहण्याची व्यवस्था देखील संघासोबतच केप टाऊन येथील कलिनन हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.

बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यामध्ये टीम इंडिया हॉटेलमध्ये शिरताना पाहायला मिळते. याच व्हिडिओत अनुष्काही विराटसोबत दिसते.

आपली प्रतिक्रिया द्या