अनुश्का शर्माच्या ‘बुलबुल’चा रहस्यमय व्हिडीओ लूक रिलीज

प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची निर्मिती असलेल्या ‘पाताल लोक’ या वेबसिरीजनंतर प्रचंड गाजली. या वेब सिरीजच्या यशानंतर आता लवकरच अनुष्का दुसरा प्रोजेक्ट घेऊन येत आहे. अभिनेत्रीने आज बुलबुल या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. हा एक रहस्यमय चित्रपट असून त्याचा फर्स्ट लूक देखील थोडा हटके आहे.

bulbul

बुलबुल एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट असून तो नेटफ्लिक्सवर 24 जून रोजी रिलीज होणार आहे. अनुष्का शर्माने शेअर केलेल्या व्हिडीओ लूकमध्ये एक मुलगी दिसत आहे. या चित्रपटात अविनाश तिवारी, तृप्ति डिमरी, पाओली डैम, परमब्रत चटर्जी, राहुल बोस यांच्या भुमिका असणार आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या