चर्चा विरुष्काच्या लग्नाची सामना ऑनलाईन | 9 Dec 2017, 9:37 pm Facebook Twitter 1 / 12 बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा व हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहली लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. गेल्या ३ वर्षांपासून विराट आणि अनुष्का रिलेशनशिपमध्ये आहेत. एका शॅम्पूच्या अॅडच्या चित्रीकरणादरम्यान २०१३ मध्ये त्यांची ओळख वाढली. २०१४: क्रिकेटच्या मैदानात विराटने अनुष्काला फ्लाइंग किस दिला. २०१५: विराट-अनुष्काचे ब्रेकअप, काही महिन्यांत पुन्हा सर्व सुरळीत 'माझ्या जीवनातील दोन खंबीर महिला' असे कॅप्शन करत जागतिक महिला दिनाच्या दिवशी विराटने आपली आई व गर्लफ्रेंड अनुष्काचा फोटो शेअर केला होता. विराट अनुष्काला 'लेडी लक', 'नुष्की' अशा नावाने हाक मारतो. लवकरच ते दोघे लग्न करणार असल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ते दोघेही इटलीमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. आपली प्रतिक्रिया द्या