‘देवसेना’ अनुष्का शेट्टीसाठी बॉलिवूडमध्ये चढाओढ

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एकदा तुम्ही यशाचे शिखर गाठले की तुमच्यामागे लोकांच्या रांगा लागतात याचा प्रत्येय येतोय बाहुबली फेम अनुष्का शेट्टीला. ‘बाहुबली’ चित्रपटातील देवसेना म्हणजे अनुष्का शेट्टीला अचानक बॉलिवूडमध्ये मागणी आली आहे. बॉलिवू़डमधील तीन मोठ्या बॅनर्समध्ये अनुष्का शेट्टीला लॉन्च करण्यासाठी घमासान सुरू झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का शेट्टीला बॉलिवूडमध्ये पदार्पणाची संधी देण्याबाबत यशराज बॅनर्स गंभीर दिसत आहे. याबाबत यशराज कॅम्पनं बाहुबलीचा बॉलिवूड पार्टनर करन जोहरची मदत मागितली आहे. यशराज फिल्म्स अनुष्का शेट्टीला ह्रितिक रोशनसोबत लॉन्च करण्याची शक्यता आहे. यासोबतच बोनी कपूर यांनीही अनुष्कानं आपल्या बॅनरखाली काम करावं यासाठी श्रीदेवीला पुढं केलं आहे. अनुष्का श्रीदेवीची फॅन असल्यानं बोनीनं हे तिला पुढे केल्याचं बोललं जात आहे.

यशराज फिल्म्स आणि बोनी कपूर यांच्या व्यतिरिक्त विधु विनोद चोपडाही अनुष्काला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी उत्सूक आहे. मात्र यात करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचे नाव दिसत नाही. आता बाहुबलीतील देवसेना कोणाच्या गळ्यात होकाराची माळ टाकते हे पाहणे औत्सुक्याचं असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या