अखेर अन्वय नाईक यांना मिळणार न्याय! शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या इशाऱ्यानंतर गृहमंत्रालयाकडून सखोल चौकशीचे आदेश

3363
anvay-naik-case

मराठी वास्तू विशारद अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अखेर नाईक कुटुंबाला न्याय मिळण्याची अशा पल्लवीत झाली आहे. अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी स्पष्टपणे Suicide Note मध्ये पत्रकार अर्णव गोस्वामी यांचे नाव लिहले असतांना सुद्धा तत्कालीन फडणवीस सरकारकडून गोस्वामींवर कोणतीही कारवाही करण्यात आली नव्हती व त्याला पाठीशी घालायचे काम सुरु होते. मराठी नाईक कुटुंबीय वणवण फिरूनही त्यांना न्याय मिळत नव्हता. त्यांच्या पत्नी अश्विनी नाईक यांनी Social Media च्या माध्यमातूनही त्यांचे दुःख आणि वेदना व्यक्तं केली होती.

…अन्यथा सत्याग्रह आंदोलन करणार – प्रताप सरनाईक

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी याची गंभीर दखल घेऊन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना पत्रं लिहून याप्रकरणी 15 ऑगस्टच्या आत सखोल चौकशीचे आदेश द्या, अन्यथा त्यांच्या पत्नी अश्विनी नाईक यांच्या सोबत मी स्वतः मंत्रालया बाहेर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याकडे ” सत्याग्रह ” करणार असा इशारा दिला होता.

संपूर्ण Social Media वर justiceforanvaynaik

आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्या नंतर Twitter instagram Facebook whatsapp सह या विषयाला जबरदस्त जनसमर्थन मिळू लागले. Twitter वर justiceforanaynaik hashtag ट्रेंड होऊ लागला. नेटकऱ्यांनी जबरदस्त उचलून धरला

अखेर सरकारकडून चौकशीचे आदेश !!!

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या सत्याग्रह आंदोलनाचा इशारा व त्यांना Social Media च्या माध्यमातून मिळणारे जनसमर्थन याची गंभीर दखल घेऊन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या विषयात सखोल चौकशीचे आदेश दिले असून पीडित नाईक कुटुंबियांना अखेर न्यायची अशा पल्लवीत झाली आहे.

नाईक कुटूंबाचे समाधान

गुन्हेगारांना शिक्षा मिळणार आणि आपल्या पतीला न्याय मिळणार हें समजताच अन्वय नाईक यांच्या पत्नी अश्विनी नाईक यांनी समाधान व्यक्त केले व महाविकास आघाडी सरकार आणि आमदार प्रताप सरनाईक यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या