सीमेजवळ अपाचे, टी-90 रणगाडे तैनात केल्याने चिनी माकडांचा थयथयाट, सरकारी वृत्तपत्रात युद्धाची भाषा

18321

लडाखमधील गलवान खोरे आणि पेंग्यांग सरोवर परिसरात हिंदुस्थान आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. 15 जूनला दोन्ही देशांच्या सैन्यात झालेल्या हिंसक झटापटीनंतर कमांडर लेव्हलच्या प्रदीर्घ चर्चेनंतर चिनी सैन्य मागे हटले आहे. चिनी सैन्याने या भागातील तंबू हटवले असले तरी चिनी मीडिया अजूनही हिंदुस्थानला युद्धाची धमकी देत आहे. हिंदुस्थानने लेहमध्ये अपाचे अटॅक हेलिकॉप्टर, चिनुक हेलिकॉप्टर, टी-90 रणगाडे तैनात केल्यानंतर चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने थयथयाट केला आहे.

चीनच्या सरकारचे बोलघेवडे वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने पुन्हा एकदा हिंदुस्थानला धमकी दिली. हिंदुस्थानने आततायीपणा केल्यास त्याला उत्तर देण्यास चीन तयार आहे. हिंदुस्थानला प्रत्युत्तर देण्यासाठी चीनची पीपल्स लिब्रेशन आर्मी तिबेटमधील उंचावरील भागात अत्याधुनिक हत्यारांसह सज्ज असल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

हिंदुस्थान वेगाने सैन्य ताकद वाढवत असला आणि युद्ध अभ्यास करत असाल तरी चीनच्या सैन्यासोबत बरोबरी करू शकत नाही. चीनचे पीएलए आर्मी रॉकेट लाँचर, रणगाडे विरोधी क्षेपणास्त्र, विमानभेदी गन, रणगाडे आणि अटॅक हेलिकॉप्टरसह सज्ज आहे. चीनने संभाव्य धोका ओळखून उंचावरील भागात ही तयारी केली असून एकप्रकारे हिंदुस्थानला धमकीवजा इशारा दिला आहे.

चीनचे सैन्य मागे हटले
हिंदुस्थानच्या कुटनीतीपुढे अखेर चीनला माघार घ्यावी लागली आणि चिनी सैन्य जवळपास दीड किलोमीटर मागे हटले आहे. अमेरिकेची स्पेस टेक्नॉलॉजी कंपनी मॅक्सरजे गलवान खोऱ्यातील सॅटेलाईट फोटो प्रसिद्ध केले आहेत. यात चिनी सैन्य जवळपास दीड किलोमीटर मागे सरकल्याचे दिसते. मात्र जुना अनुभव असल्याने हिंदुस्थानने सावध भूमिका घेत सीमारेषेवर अपाचे अटॅक हेलिकॉप्टर, टी-90 रणगाडे, मिग-29 विमान तैनात ठेवले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या