लॉस एंजेलिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बर्लिन’चा प्रीमियर

अष्टपैलू अभिनेता अपारशक्ती खुराणा याच्या ‘बर्लिन’ चित्रपटाची लॉस एंजेलिस 2023 च्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियरसाठी निवड झाली आहे. विविध पात्रं साकारणारा अभिनेता अशी ओळख असणारा या चित्रपटात अपारशक्ती आव्हानात्मक भूमिकेत दिसत आहे.

‘ज्युबिली’ या वेब सीरिजमधील मदन कुमारच्या भूमिकेत लोकप्रिय ठरल्यानंतर अपारशक्ती आता ‘बर्लिन’मध्ये लेखक अतुल सबरवाल यांच्यासोबत काम करत आहे. सबरवाल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटात कबीर बेदी, राहुल बोस, इश्वाक सिंग आणि अनुप्रिया गोयंका या प्रमुख कलाकारांच्या भूमिका आहेत.

‘बर्लिन’मधील व्यक्तिरेखेसोबत अपारशक्ती ‘स्त्री 2’मध्ये बिट्टूचे प्रिय पात्र पुन्हा एकदा साकारत आहे. तसेच ऍप्लाज एंटरटेन्मेंटच्या सहकार्याने ‘फाइंडिंग राम’ नावाचा आगामी माहितीपटदेखील तो करत आहे.