ऍपल कंपनीने आपली बहुचर्चित आयफोन 16 सीरिज सोमवारी लाँच केली आहे. या सीरिजमध्ये कंपनीने चार फोन लाँच केले. यात आयफोन 16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स हे चार आयफोन लाँच केले असून या फोनची प्री बुकिंग 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपासून सुरू होणार आहे, तर विक्री 20 सप्टेंबरपासून सुरू केली जाणार आहे. आयफोन 16 चा पहिला सेल 20 सप्टेंबरला सुरू होणार आहे. हिंदुस्थानसह अनेक देशात आयफोनला मोठी मागणी आहे.
आयफोन 16 128 जीबी 79,900 रु.
आयफोन 16 56 जीबी 89,900 रु.
आयफोन 16 512 जीबी 1,09,900 रु.
आयफोन 16 प्लस 128 जीबी 89,900 रु.
आयफोन 16 प्लस 256 जीबी 99,900 रु.
आयफोन 16 प्लस 512 जीबी 1,19,900 रु.
आयफोन 16 प्रो 128 जीबी 1,19,900 रु.
आयफोन 16 प्रो 256 जीबी 1,29,900 रु.
आयफोन 16 प्रो 512 जीबी 1,49,900 रु.
आयफोन 16 प्रो 1 टीबी 1,69,900 रु.
आयफोन प्रो मॅक्स 256 जीबी 1,44,900 रु.
आयफोन प्रो मॅक्स 512 जीबी 1,64,900 रु.
आयफोन प्रो मॅक्स 1 टीबी 1,84,900 रु.
जुन्या फोनच्या किमतीत कपात
आयफोनची नवी सीरिज लाँच होताच कंपनीने आयफोन 15 च्या किमतीत 10 हजार रुपयांपर्यंत कपात केली आहे. ऍपल स्टोअर ऑनलाइनवर कपात झालेल्या किमती दिसत आहेत. आयफोन 15 चा 128 जीबी स्टोरेजचा बेस फोन 69,900 रुपयांत लिस्ट आहे. 256 जीबी स्टोरेजच्या फोनला 89,900 रुपयांऐवजी 79,900 रुपयांत खरेदी केले जाऊ शकते. आयफोन 14 च्या किमतीतसुद्धा कपात करण्यात आली. 69,900 रुपयांना मिळणार फोन आता 59,900 रुपयांना मिळत आहे. आयफोन 14 चा 256 जीबीचा फोन 69,900 रुपयांना मिळत आहे.
रंगीबेरंगी कलर्स
आयफोन 16 सीरिजमध्ये अल्ट्रामरीन, टील, पिंक, व्हाइट, ब्लॅक कलरमध्ये फोन उपलब्ध करणार आहे. 16 प्रो सीरिजमध्ये डेजर्ट टायटेनियम, नेचुरल टायटेनियम, व्हाइट टायटेनियम, ब्लॅक टायटेनियम कलर ऑप्शन आहेत.
जबरदस्त फीचर्स
आयफोन 16 सीरिजमध्ये लेटेस्ट आणि दमदार ए18 चिपसेट दिले आहे. फोनमध्ये डय़ुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 12 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेन्ससोबत 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे. आयफोन 16 प्रो सीरिजमध्ये ए18 प्रो चिपसेट दिले आहे. यात ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे.
5जी स्मार्टफोन विक्रीत हिंदुस्थान अमेरिकेच्या पुढे
हिंद्स्थानात फोनचे मार्केट हे अन्य देशांच्या तुलनेत सर्वात मोठे आहे. हिंदुस्थानात 5जी फोनच्या विक्रीचा रेकॉर्ड झाला असून स्मार्टफोनच्या विक्रीने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. देशात शाओमी, विवो आणि सॅमसंग यासारख्या ब्रँड्सने स्वस्तात 5जी फोन मार्केटमध्ये उपलब्ध केले. जागतिक स्तरावर 5जी स्मार्टफोनच्या विक्रीत 20 टक्के वाढ झाली. ऍपल 25 टक्क्यांहून अधिक विक्री सोबत पहिल्या स्थानावर आहे. सॅमसंग 21 टक्क्यांसोबत दुसऱया तर शाओमी तिसऱया स्थानावर आहे. विवोच्या 5 जी फोनला हिंदुस्थान, चीनमध्ये मागणी आहे.