Apple iPhone SE 2020 मिळत आहे मोठी सवलत; जाणून घ्या किती..

अॅपलने अलीकडेच आपला नवीन iPhone SE 2020 हिंदुस्थानी बाजारात लॉन्च केला आहे. हा नवीन आयफोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. आता अॅपल आपल्या याच आयफोनवर वेगवेगळ्या ऑफर देत आहे. या ऑफर तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यास तुम्हाला मिळणार आहे. iPhone SE 2020 हा अॅपलचा सर्वात स्वस्त फोन आहे. फ्लिपकार्टवरून iPhone SE 2020 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट खरेदी केल्यास 3,600 रुपयांपर्यंतची सवलत मिळू शकते. तसेच एचडीएफसी डेबिट कार्ड ग्राहकांना ईएमआयशिवाय फोन खरेदीवर 1,500 रुपयांची त्वरित सवलत मिळू शकते. यासोबतच तुम्ही हा फोन एचडीएफसी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने ईएमआयवर घेतल्यास तुम्हाला 3,600 रुपयांची त्वरित सवलत मिळू शकते.

फ्लिपकार्ट या फोन खरेदीवर 13,250 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील ग्राहकांना देत आहे. ज्यांच्याकडे फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट आणि अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड आहे, त्यांनाही याफोनवर पाच टक्के सवलत मिळू शकते. तसेच हा फोन 3, 542 रुपयांच्या विना-किंमत ईएमआयवरही खरेदी करण्याची ऑफर देण्यात आली आहे. यासोबतच हा फोन खरेदी केल्यास कंपनी ग्राहकांना पार्टनर ऑफर अंतर्गत 6-महिन्यांची युट्यूब प्रीमियम फ्री ट्रायल देखील देत आहे.

Apple iPhone SE 2020 फीचर्स

कंपनीनं हा फोन 64 जीबी, 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध केला आहे. नव्या आयफोनमध्ये सिंगल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. F/1.8 सह 12 मेगापिक्सेलचा हा कॅमेरा असून याद्वारे 4के व्हिडीओही शूट करता येणार आहे. तर सेल्फीसाठी यामध्ये 7 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्यासोबतच यात एचडीआर आणि पोर्टेटसारखेही फिचर्स आहेत. ब्लॅक, व्हाईट आणि (प्रोडक्ट) रेड या रंगांच्या पर्यायात नवीन आयफोन उपलब्ध आहे. iPhone SE 2020 मध्ये 4.7 इंचाचा रॅटिना HD IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यामध्ये आयफोनच्या अत्याधुनिक A13 Bionic chip चा वापर करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या