कुंभ

324

‘‘दुष्ट मनुष्य आपल्या आश्रयदात्यालासुद्धा नाशाकडे घेऊन जातो. ज्या वृक्षाने छाया दिली त्यालाच छाटून टाकतो. कोणतेही दुःख हे सुखापेक्षा नेहमी मोठेच ठरते’’

नव्या दिशेने जाण्याचे ठरवाल. तुमच्या क्षेत्रात नवे पाऊल टाकण्याचा योग येईल. स्वतंत्र धंदा मोठे स्वरूप घेऊ शकतो. आपण एखादे कठीण काम पूर्ण करतो, जबाबदारी संपली असे वाटते, तोच त्यातून दुसरी जबाबदारी निर्माण होते आणि आपण अडचणीत येतो. शारीरिक व मानसिक दडपण वाढते. वर्षभर कन्या राशीत गुरूचे भ्रमण होणार आहे. अष्टमस्थानातील गुरू महाराज तुम्हाला आर्थिक लाभ करून देईल. भलत्या मोहजालात पैसे गुंतवणे धोक्याचे ठरेल. २६ जानेवारी २०१७ शनी धनु राशीत म्हणजे कुंभ राशीच्या एकादशस्थानात प्रवेश करीत आहे. जूनमध्ये शनी वक्री होऊन वृश्चिकेत येत आहे. २६ ऑक्टोबरला २०१७ शनी मार्गी होऊन धनु राशीत भ्रमण करणार आहे. तुमच्या राशीला शनीचे राश्यांतर फायदेशीर ठरेल. कौटुंबिक वाटाघाटीत फायदा होईल. रेंगाळत पडलेला जमीन-घराचा व्यवहार पूर्ण होऊ शकेल. १८ ऑगस्ट २०१७ कुंभ राशीच्या षष्ठास्थानात म्हणजे कर्केत राहू व व्ययस्थानात म्हणजे मकरेत केतू प्रवेश करीत आहे. तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक तुम्हाला कळतील. या वर्षात आरोप येतील. निष्कारण टीका सहन करावी लागेल. १२ सप्टेंबर २०१७ गुरू तूळ राशीत प्रवेश करीत आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष तुमच्या नित्यक्रमात अडचणी येतील. किरकोळ तणाव होईल. ज्यांना मदतीचा हात दिला तेच तुमच्या मागे कट करण्याचा प्रयत्न करतील. बुद्धिमान माणूस मात्र याकडे तटस्थ भूमिकेतून पाहतो व मगच प्रहार करतो. सविस्तर भविष्य पुढे पाहूया.

राजकीय – सामाजिक क्षेत्र:

राजकीय-सामाजिक क्षेत्रात अष्टावधानी राहून कार्य केल्यास चांगला विकास होईल. विरोधकांचा जाने., फेब्रु.मध्ये होईल. नोव्हें.मध्ये प्रवासात सावध राहा. धावपळ, दगदग वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. चिंता वाढेल. मार्च, एप्रिल व मेमध्ये तुमच्या योजना गतिमान होतील. आर्थिक सहाय्य जमा करता येईल. मे, जूनमध्ये आरोप येतील. टीका होईल. जनसंपर्क वाढविण्याचे काम होईल, मार्च, ऑगस्टमध्ये धाडसी कार्य हातून होईल. सप्टें., ऑक्टोबर आर्थिक लाभ झाला तरी मनस्ताप होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांच्या मर्जीने राहावे लागेल. तुमचे मुद्दे पटवून देताना संयम व चाणाक्ष बुद्धीचा वापर करा. माणसे पारखून घ्या व मगच त्यांच्यावर जबाबदारी टाका. आपली प्रतिष्ठा टिकवणे महत्त्वाचे ठरेल. २० ऑक्टोबरपासून तुमच्या मार्गातील अडथळे निर्माण होतील.

नोकरी-व्यवसाय:

शेतकरीवर्गाला कष्ट घ्यावे लागतील. फायदा होईल, पण खर्चही वाढेल. नवीन तंत्राचा वापर करताना पूर्ण विचार करा. नोकरीत अडचणी येतील व कामाचा व्याप वाढेल. आर्थिक लाभ होईल. कुटुंबापासून दूर राहण्याचा योग नोव्हें., जाने.मध्ये येऊ शकतो. तुमच्या कामाचे श्रेय दुसरा घेऊन जाण्याची शक्यता आहे. मार्च, एप्रिलमध्ये प्रमोशन अथवा चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकेल. जुलैमध्ये शारीरिक, मानसिक त्रास होईल. गुंतवणूक करताना या काळात काळजी घ्या. व्यवसायात झाला तर मोठा फायदा होऊ शकतो किंवा मोठे नुकसान असा विचित्र योग होत आहे. आमिषापोटी भलत्या ठिकाणी पैसे गुंतवू नका. गोड बोलून टोपी घालणाऱयापासून सावध राहा. वाहन, घर वगैरे खरेदीत नुकसान संभवते. खरेदी-विक्रीच्या धंद्यात फायदा होऊ शकतो.

विद्यार्थी – तरुणवर्ग:

विद्यार्थीवर्गाने प्रकृतीची काळजी घ्यावी. फास्टफूडच्या नावाने पोटाचा विकार होईल. ऑक्टो., नोव्हें., डिसें.मध्ये येणाऱया परीक्षा ठीक असतील. या वर्षात प्रामाणिकपणे संपूर्ण अभ्यास केल्यासच यश मिळेल. महत्त्वाचेच प्रश्न फक्त करून चालणार नाही. नोव्हें., एप्रिल व जुलैमध्ये दुखापत संभवते. वाहनापासून धोका आहे. कोणत्याही क्षेत्रात भलते जीवावर बेतणारे धाडस करू नये. सोप्या मार्गाने यश मिळेल असे समजू नये. उदास न होता मेहनत करा. जिद्द ठेवा, प्रगतीचा सूर्य उगवतोच.

महिलावर्ग:

अनेक विषयात रस घेऊन विविध गोष्टी तुम्ही करता. मनापासून तुम्ही जे काम करता ते कौतुकास्पद ठरते. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल तेथे जाने. व मेमध्ये मनस्ताप होऊ शकतो. व्यवसायात मोठे काम मिळेल, पैसा मिळेल. योग्य ठिकाणी पैसे ठेवा. वाताचा त्रास प्रकृतीला होऊ शकतो. गायनिक प्रॉब्लेम होण्याचा संभव आहे. ऑपरेशन करण्याची वेळ येऊ शकते. घरातील व्यक्तीची चिंता वाटेल. आप्तेष्टांना मदत करावी लागेल. पुढील दिवाळी तुमच्या अपेक्षा पूर्ण करील.

आपली प्रतिक्रिया द्या