मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

4304

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले आहे. आराध्याने वाढदिवस साजरा न करता ते पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पीएम केअर्स निधीला दिले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जनतेशी संवाद साधतांना आराध्याचे कौतुक केले होते.

आराध्या अजय कडू हिने वाढदिवसासाठी खर्च करण्यात येणारे 10 हजार रुपये कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी दिले. तिच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिचे कौतुक केले. आराध्या ही बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर अजय कडू यांची कन्या आहे. तिचा सातवा वाढदिवस काल होता. वाढदिवस साजरा न करता हे पैसे आपण मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीला द्यायचे का? असे कडू यांनी आराध्या आणि मुलगा आर्यन यांना विचारले. यावर त्या दोघानीही पैसे द्या, असे लगेच सांगितले. त्यानुसार कडू यांनी काल पाच हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस आणि पाच हजार पीएम केअर्स फंडासासाठी जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द केले.

आराध्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीत शिकते. बोलक्या स्वभावाची आराध्या स्केटींग उत्तम करते. आर्यन आठव्या इयत्तेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या