मलायका अरोरा होणार अर्जुन कपूरच्या बाळाची आई?

बॉलिवूडची आयटम गर्ल मलायका अरोरा ही तिच्या बोल्ड लुक्स आणि फिटनेसमुळे लोकप्रिय आहे. तिचं अर्जुन कपूरसोबतचं नातंही तितकंच चर्चेत असतं. आता पुन्हा एकदा या जोडी चर्चेत आली आहे. कारण, मलायका अरोरा वयाच्या 49व्या वर्षी अर्जुन कपूरच्या बाळाची आई बनणार असल्याचं बोललं जात आहे.

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, या जोडीच्या निकटवर्तीयांपैकी एकाने ही माहिती दिली आहे. ही जोडी एका बाळाचे पालक होणार असल्याचं त्यांनी ऑक्टोबरमध्ये लंडन येथे काही जवळच्या मंडळींसमोर जाहीर केल्याचं या निकटवर्तीयाचं म्हणणं आहे, अशी माहिती पिंकविलाने दिली आहे.

या माहितीत कितपत तथ्य आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. कारण, अर्जुन कपूर आणि मलायकाने काहीही अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही. त्यामुळे नेमकं काय सत्य आहे, हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे.