तुम्हालाही दुसऱ्यांचा इयरफोन वापरण्याची सवय आहे? आताच बदला, अन्यथा बहिरे व्हाल…

कोणाचाही इयर फोन तुम्ही कानाला लावत असाल, तर हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. इयरफोन किंवा हेडफोनच्या अतिवापरामुळे जगभरातील सुमारे 100 कोटी तरुणांच्या श्रवण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे इयर फोन्स शेअर करणेही धोकादायक ठरू शकते, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे या संदर्भातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या गावातील एक 18 वर्षांचा मुलगा इअरफोन शेअर केल्यामुळे बहिरा झाला आहे, येथील डॉक्टरांनीच याबाबत माहिती दिली आहे.

स्वत:चा इअरफोन दुसऱ्याला वापरायला दिल्यामुळे मुलाच्या कानाला संसर्ग झाला आणि हळूहळू त्याला ऐकू येणे बंद झाले. जेव्हा त्रास वाढला तेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे दोन शस्त्रक्रिया करूनही काही फायदा झाला नाही. यानंतर कुटुंबीय त्याला घेऊन दिल्लीला गेले. जिथे त्याची सामान्य ऐकण्याची क्षमता इम्प्लांट करून त्यावर उपचार करण्यात आले.

मिडिया रिपोर्टनुसार, पीडित मुलगा दिवसाला 8 ते 10 तास इयरफोनचा वापर करत असे. सुरुवातीला त्याचे कान दुखू लागले. आपल्या मित्रांचे इयरफोन्सही तो वापरत होता. त्यामुळे त्याच्या त्रासात अजूनच वाढ होऊ लागली. या मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, इअरफोन शेअर केल्याने त्याच्या कानात संसर्ग झाला. एवढे करूनही त्याची इयरफोनशी असलेली ओढ कमी झाली नाही आणि त्याची अवस्था अशी झाली की, इअरफोन लावला तरीही त्याला अजिबात ऐकू येत नसे. कानात बॅक्टेरिया वाढल्यामुळे श्रवणशक्ती खूपच कमी झाली त्यानंतर उपचाराकरिता डॉक्टरकडे आला. यासाठी त्याला दीड लाख रुपये खर्च करावे लागले.

आपल्या कानात एक पडदा असतो ज्याला इअर ड्रम म्हणतात. जेव्हा कोणी जास्त वेळ इअरफोन किंवा हेडफोन वापरतो किंवा मोठ्या आवाजात गाणी ऐकतो तेव्हा तो आवाज आणि त्याच्या कंपन दाबाने कानाच्या ड्रमवर आदळतो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, इयरफोन किंवा हेडफोनच्या अतिवापरामुळे जगभरातील सुमारे 100 कोटी तरुणांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

इअरफोन किती वेळ वापरावेत ?
एका अभ्यासानुसार, जर कोणी दोन तासांपेक्षा जास्त वेळ 90 डेसिबलपेक्षा जास्त मोठ्या आवाजात गाणी ऐकत असेल तर तो बहिरेपणाचा बळी तर होऊ शकतोच, पण त्याला इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. आपले कान 90 डेसिबलपर्यंत ऐकू शकतात. जेव्हा आपण गाणी खूप मोठ्याने ऐकतो तेव्हा ते 40-50 डेसिबलपर्यंत पोहोचू शकते. यापेक्षा दूरचा आवाज कमी ऐकू येतो. तज्ज्ञांच्या मते, मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने हृदयाचे ठोके खूप वाढतात. हृदयाचे ठोके सामान्य गतीपेक्षा अधिक वेगाने होतात. त्यामुळे त्याचे नुकसान होऊ शकते. इअरफोनमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी बाहेर पडतात, त्याचा मेंदूवरही नकारात्मक परिणाम होतो.