मेस्सीची हॅटट्रिक,अर्जेंटिनाकडून हैतीचा धुव्वा

42

सामना ऑनलाईन, ब्यूनसआयर्स

स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीने मंगळवारी रात्री जबरदस्त हॅटट्रिक करून फुटबॉल वर्ल्ड कपपूर्वी प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला आहे. मेस्सीच्या हॅटट्रिकच्या जोरावर अर्जेंटिनाने मैत्रीपूर्ण लढतीत हैती संघाचा ४-० गोल फरकाने धुव्वा उडविला. लियोनेल मेस्सीने १७ व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉटवरून सुरेख गोल केला. त्यानंतर मेस्सीने ५७ व्या मिनिटाला आणखी एक भन्नाट गोल केला. मग पुढच्या आठच मिनिटांनी म्हणजे ६५ व्या मिनिटाला मेस्सीने हॅटट्रिक गोल करून अर्जेंटिनाची आघाडी ३-० अशी भक्कम केली.

आपली प्रतिक्रिया द्या