कोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…

3547

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेला कोरोना व्हायरस आता हाहाकार उडवत आहे. जगभरात लाखो लोकांना याची लागण झाली असून 27 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. चीन, अमेरिका, इटली, स्पेन, इराण या देशात कोरोनाचा प्रभाव जास्त दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. यातील एक नाव आहे अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू पाओलो दिबाला याचे. इटलीच्या युवेंटस क्लबसाठी खेळणारा पाओलो दिबाला कोरोनामुक्त झाला असून यानंतर त्याने आपली आपबिती कथन केली आहे.

कोरोना व्हायरसने इटली या देशात 5000 पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे. इटलीच्या एका क्लबकडून खेळणाऱ्या पाओलो दिबाला यालाही कोरोनाची लागण झाली होती, मात्र उपचारानंतर तो बरा झाला आहे. या काळातील आपला अनुभव सांगताना पाओलो दिबाला म्हणतो, काही दिवसांपूर्वी मी खूप वाईट परिस्थितीत होतो. प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला धाप लागायची, स्नायू ताठरले जायचे.

तो पुढे म्हणतो, या जीवघेण्या आजारातून आता मी वाचलो असून सध्या माझी प्रकृती सुधारत आहे. या काळातील दिवस माझ्यासाठी एका दुःस्वप्नासारखे वाटले. मला खूप त्रास होत होता. जास्तीत जास्त पाच मिनिटे मी हालचाल करू शकायचो. पण त्यानंतर मला हालचाल करणं अशक्य व्हायचं. कारण मला धाप लागायची, श्वास घ्यायला अडचणी यायच्या. या सगळ्यांमुळे मी थकून जायचो. पण, मला काही करता यायचं नाही. मला हतबल झाल्यासारखं वाटत होतं. सगळ्या शरीरातले स्नायू आखडून जायचे आणि त्यामुळे शरीर जड झाल्यासारखं वाटायचं, अशा शब्दात पाओलोने आपली आजारावेळची अवस्था उलगडून सांगितली.

पत्नीलाही झाला होतो कोरोना
पाओलो दिबाला याची पत्नी आणि अर्जेंटिनाची स्टार सिंगर ओरिआना सबातिनि हिला देखील कोरोना झाला होता. मात्र तिने देखील यावर मात केली आणि आता तिची प्रकृती सुधारत आहे.

screenshot_2020-03-28-16-48-54-425_com-android-chrome

27365 मृत्यू
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या विळख्यात संपूर्ण जग अडकले असून 199 देशात हा व्हायरस पसरला आहे. जगभरात 27365 लोकांचा मृत्यू झाला असून दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. इटली, स्पेन आणि फ्रांस या देशात कोरोना व्हायरसमुळे 16267 लोकांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या