Video – कॉलेजच्या मुलींमध्ये वाद, बस स्टॉपवरच एकमेकींच्या झिंज्या खेचल्या

Argument between college girls in Chennai

चेन्नईमध्ये कॉलेज विद्यार्थिनींमधील वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मंगळवारी, 26 एप्रिल रोजी चेन्नईतील बस स्टॉपवर ही घटना घडली.

उत्तर चेन्नईतील न्यू वॉशरमनपेट येथील बस स्टॉपवर कॉलेजच्या विद्यार्थिनी बसची वाट पाहत असताना विद्यार्थिनींमध्ये वाद झाला. गंभीर बाब म्हणजे बसस्थानकावरच त्यांच्यात जोरदार मारामारी झाली.

विद्यार्थिनी जमिनीवर लोळत होत्या आणि एकमेकींशी भांडत असल्याने आसपास उभ्या असलेल्या लोकांनाही हस्तक्षेप करणे अवघड झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

गस्तीवर असलेल्या पोलिसांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी हस्तक्षेप करून गट वेगळे केले. त्यानंतर विद्यार्थिनींला सल्ला देऊन सोडण्यात आले. त्यांच्यातील या वादाचे कारण मात्र समजू शकलेले नाही. मात्र त्यांच्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून चर्चेचा विषय झाला आहे.