दिल्लीकडे झेपावलेले अफगाणिस्तान एअरलाईन्सचे विमान कोसळले, विमानात 110 प्रवासी

4325

अफगाणिस्तानमध्ये हेरात विमानतळावरून दिल्लीकडे उड्डाण घेतलेल्या प्रवासी विमानाचा अपघात झाला आहे. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास एरियाना अफगान एअरलाईन्सचे विमान पूर्व गझनी प्रांतामध्ये कोसळले. विमान कोसळले तो भाग तालिबानच्या नियंत्रणाखाली असून अद्याप दुर्घटनेमध्ये किती लोकांचा मृत्यू झाला याबाबत माहिती मिळालेली नाही. अपघातग्रस्त विमानामध्ये 110 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे.

अफगाणिस्तानची वृत्तवाहिनी ‘एरियाना’ने दिलेल्या वृत्तानुसार, एरियाना अफगान एअरलाईन्सच्या ताफ्यातील बोईंग विमानाने हेरात विमानतळावरून दिल्लीसाठी उड्डाण घेतले होते. या दरम्यान तांत्रिण कारणामुळे विमान पूर्व गझनी प्रांतामध्ये कोसळले. ही दुर्घटना घडली तेव्हा विमानात 110 प्रवासी होते.

गझनी प्रांताच्या राज्यपालांचे प्रवक्ते आरिफ नूरी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, देह याक जिल्ह्यात स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी विमान दुर्घटनाग्रस्त झाले. हा भाग तालिबानच्या ताब्यात आहे. दुर्घटनेमागील नक्की कारण सध्या स्पष्ट झालेले नाही. गझनी प्रांतातील डोंगराळ भागात विमान कोसळले आहे. थंडीच्या दिवसांमध्ये या भागात वातावरण खराब असते, असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या