पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी डॉ. अरीफ अलवी यांची निवड

6

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ’ (पीटीआय) पक्षाचे उमेदवार डॉ. अरीफ अलवी यांची पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. डॉ. अलवी पाकिस्तानचे 13वे अध्यक्ष झाले असून येत्या 9 सप्टेंबर रोजी ते सूत्रे हाती घेतील. विद्यमान राष्ट्राध्यक्ष मामनून हुसेन यांचा कार्यकाळ 8 सप्टेंबर रोजी संपणार आहे.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत पीटीआयतर्फे डॉ अलवी, , पाकिस्तान मुस्लीन लीग (नवाज) पक्षातर्फे मौलाना फझल उर रहेमान आणि पाकिस्तान पीपस पार्टीचे उमेदवार ऐतजाज अहसान हे तिघे रिंगणात होते. राष्ट्रीय विधानसभेतील एकूण 430 सदस्यांनी मतदान केले. डॉ अलवी यांना 212 मते, रहेमान यांना 131 तर अहसान यांना 81 मते मिळाली. मतमोजणीत सहा मते बाद झाली.

आपली प्रतिक्रिया द्या