वयाच्या 46 व्या वर्षी तिसऱ्यांदा बाप झाला ‘हा’ अभिनेता

52

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता अर्जुन रामपाल हा वयाच्या 46 व्या वर्षी तिसऱ्यांदा बाप झाला आहे. अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएला हीने शुक्रवारी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अर्जुन व गॅब्रिएला गेल्या वर्षभरापासून एकत्र असून ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे बोलले जात आहे.

arjun-rampal-gabriela-1

अर्जुनचा पहिला विवाह हा प्रसिद्ध मॉडेल मेहेर जेसिआसोबत झाला होता. तब्बल 19 वर्ष संसार केलेल्या या जोडप्याला दोन मुली आहेत. मात्र दोन वर्षांपूर्वी या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तब्बल वर्षभराने गॅब्रिएला व अर्जुनचे अफेयर सुरू झाले. मात्र अद्याप अर्जुन व मेहेरचा घटस्फोट झालेला नाही. एप्रिल महिन्यात अर्जुनने त्याचा व गरोदर असलेल्या गॅब्रिएलाचा एक फोटो शेअर करत त्यांच्याकडे गूडन्यूज असल्याचे जाहीर केले

गॅब्रिएला ही मूळची दक्षिण आफ्रिकेची असून ती 2013 मध्ये हिंदुस्थानात आली. निळ्या डोळ्यांची गॅब्रिएला ही 32 वर्षांची आहे तर अर्जुन रामपाल हा 47 वर्षांचा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या