अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडकडे गूड न्यूज

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता अर्जुन रामपाल याचा अद्याप त्याची पत्नी मेहर जेसिआ सोबत घटस्फोट झालेला नसतानाच त्याने त्याची गर्लफ्रेंड गरोदर असल्याचे जाहीर केले आहे. अर्जुन रामपाल हा सध्या त्याच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएडेसला डेट करत आहे. अर्जुनने सोशल मीडियावर त्या दोघांचा एक फोटो शेअर केला असून त्यात गॅब्रिएला गरोदर असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.


View this post on Instagram

Blessed to have you and start all over again….thank you baby for this baby

A post shared by Arjun (@rampal72) on

गेल्या वर्षी अर्जुन व त्याची पत्नी मेहरने त्यांचा 20 वर्षांचा संसार मोडला असल्याचे घोषित केले होते. त्या दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. मात्र पोटगीच्या रकमेवरून सध्या त्यांचा घटस्फोट झालेला नसल्याचे समजते. पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर त्य़ाचे काही महिन्यातच गॅब्रिएलासोबत सूत जुळले. तेव्हापासून ते लिव्ह इनमध्ये राहत आहेत.

गॅब्रिएला ही मूळची दक्षिण आफ्रिकेची असून ती 2013 मध्ये हिंदुस्थानात आली. निळ्या डोळ्यांची गॅब्रिएला ही 32 वर्षांची आहे तर अर्जुन रामपाल हा 47 वर्षांचा आहे.