कोहली काजोलच्या बहिणीला मारहाण करायचा!

110

सामना ऑनलाईन । मुंबई

मैत्रिणीला जबर मारहाण करून तिला जखमी करणाऱ्या अभिनेता अरमान कोहलीला तूर्तास दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला. गंभीर बाब म्हणजे काजोलची बहीण तनीषा हिला देखील कोहली मारहाण करायचा अशी माहिती आता चर्चेत आली आहे.

‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या एका मुलाखतीत अरमान कोहलीची लिव्ह इन पार्टनर निरू रंधवाने सांगितलं आहे की, ‘अरमानने तनीषावर हात उचलला होता. मला ही माहिती नोकरांनी दिली. तसेच त्या दोघांच्या मित्रांनी देखील मला सांगितलं की अरमान तिला अनेकदा मारहाण करायचा.’

kajol-armaan-kohli

तनीषा आणि अरमान बिग बॉस- ७मधून एकमेकांच्या जवळ आले होते. टीव्हीवर देखील त्यांची जवळीक पाहायला मिळाली होती. या अफेअरमुळे काजोल आणि तिची आई अपसेट होत्या. बिग-बॉस संपल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं.

दरम्यान, मारहाण प्रकरणी आपल्या विरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यासाठी अरमानने हायकोर्टात धाव घेतली. यापुढे असे कृत्य पुन्हा होणार नाही, अशी लेखी हमी देण्याचे आदेश देत न्यामूर्तींनी याबाबतची सुनावणी उद्यापर्यंत तहकूब केली. न्यायमूर्ती आर.एम. सावंत आणि न्यायमूर्ती रेवती मोहिती-डेरे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. निरू रंधावा हिला अरमानने मारझोड केली नसून चुकून धक्का लागल्याने ती जिन्यावर पडून जखमी झाली, असा दावा त्याचे वकील सतीश माने-शिंदे यांनी आज हायकोर्टात केला. त्याचबरोबर झालेल्या चुकीबद्दल आपण निरूची माफी मागितली असून तिला योग्य ती नुकसानभरपाईही दिल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले. त्या वेळी आपण जिन्यात पडून जखमी झाल्याचे नाकारत निरूने अरमान कोहलीचा हा दावा फोल ठरवला. दोघांचाही युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर नुकसानभरपाई हे प्रत्येक चुकीचे समाधान होऊ शकत नाही, असे खंडपीठाने कोहलीला सुनावले व तूर्तास दिलासा देण्यास नकार दिला.

आपली प्रतिक्रिया द्या