दुकानात चोरटा शिरला; महिला कर्मचाऱ्याने सेक्स टॉयने बदडत हुसकावले!!

दुकानावर दरोडा पडला किंवा चोरटे शिरले की, तेथे असलेले कर्मचारी भांबावून जातात. नेमके काय करावे, हेच त्यांना समजत नाही. काहीजण प्रसंगावधान राखत चोरट्यांना हुसकावून लावतात. तर काहीजण चोरटे जेरबंद होतील, अशा गोष्टी करतात. रशियात एका दुकानात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या चोरट्याला तेथील महिला कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत हुसकावून लावले आहे. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रशियातील एका दुकानात चोरीच्या उद्देशाने चोरटा शिरला होता. त्यावेळी तेथे असलेल्या महिला कर्मचारी भाबांवून गेली. काय करावे, हेच त्यांना सुचेना. त्यावेळी त्यांच्या हाताला एक सेक्स टॉय लागले. त्या सेक्स टॉयनेच त्यांनी चोरट्याला बदडायला सुरुवात केली. अचानक झालेल्या या विचित्र हल्ल्याने आणि कर्मचाऱ्याच्या आक्रमकपणामुळे चोरट्याची पाचावर धारण बसली आणि त्याने दुकानातून पळ काढला. ही घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

रशियातील नोवोकुज़नेत्स्क शहरातील एका सेक्स टॉयच्या दुकानात 24 जुलैला चोरीच्या उद्देशाने चोरटा शिरला होता. त्याने शस्त्राचा धाक दाखवत दुकानातील वस्तू चोरण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिथे असलेल्या महिला कर्मचाऱ्याला काय करावे, तेच समजेना. त्यांच्या हाताला एक सेक्स टॉय लागले. त्यांनी आक्रमकपणा दाखवत सेक्स टॉयनेच चोरट्याला बदडायला सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्याने पळ काढला. त्यावेळी महिला त्याला दुकानाबाहरे हुसकावताना व्हिडीयोत दिसत आहेत. द डेली मेलने याबाबतच वृत्त दिले आहे.

व्हिडीयोत दिसणारे फूटेज खरे आहे की बनावट आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. फूटेजमध्ये सशस्त्र चोरटा शस्त्राचा धाक दाखवत चोरीचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यानंतर महिला कर्मचाऱ्याने त्याला कसे बदडले, हेदेखील दिसत आहे. या घटनेबाबत अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महिला कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधाने अनेक नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या