एलोसीवर कधीही परिस्थिती बिघडू शकते, लष्कर प्रमुखांचा इशारा

1057

पाकिस्तानकडून सतत सीमाभागात गोळीबार केला जात आहे. सीमेवरील परिस्थिती कधीही बिघडू शकते. त्यामुळे देशाला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार रहायला हवे, असा इशारा लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे. पाकिस्तानकडून सतत होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला आहे.

जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटविल्यापासून पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघन करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना लष्कर प्रमुख म्हणाले, ‘पाकिस्तान एक असा देश आहे जो स्वत:ला मिटवायला निघाला आहे. सध्या ते नियंत्रणात नाही. त्यामुळे सीमेवरची परिस्थिती बिघडत चालली आहे. देशवासियांनी सर्व परिस्थितीसाठी सज्ज राहायला हवे. आम्ही देखील प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहोत’, असे बिपीन रावत यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या