गिलगिट- बाल्टिस्तानसह पीओके हिंदुस्थानचाच; लष्करप्रमुख गरजले

1113

गिलगिट- बाल्टिस्तानसह पीओके हिंदुस्थानचाच अविभाज्य भाग असल्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी ठणकावून सांगितले आहे. हा भाग हिंदुस्थानचाच असून पाकिस्तानने या भागवर अवैधपणे कब्जा केल्याचे त्यांनी सांगितले. आपण जेव्हा जम्मू कश्मीर म्हणतो, त्यावेळी पूर्ण जम्मू कश्मीरसह , पीओके आणि गिलगिट- बाल्टिस्तानचाही त्यात समावेश होतो, असे ते म्हणाले.

हा भाग हिंदुस्थानचाच असून पाकिस्तानने त्यावर अवैधपणे कब्जा केला आहे. मात्र, हा भाग पाकिस्तानकडून नियंत्रित होत नसून त्यावर दहशतवाद्यांचे नियंत्रण आहे. जम्मू कश्मिरच्या विकासासाठी कलम 370 रद्द करण्यासाठी ही योग्य वेळ होती, असेही रावत यांनी स्पष्ट केले. जम्मू कश्मीरमधील वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न दहशतवाद्यांकडून सुरू आहेत. त्यासाठी ट्रक चालकांवर हल्ले होत आहेत. शाळा बंद करण्यासाठी शाळा प्रशासनाला धमक्या देण्यात येत आहे. मात्र, आपले लष्कर सतर्क असून कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येत असल्याचे रावत यांनी स्पष्ट केले. जम्मू कश्मीरमधील परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यात शांतता कायम ठेवण्यासाठी लष्कराचे जवान दिवसरात्र प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. जम्मू कश्मीरात शांतता प्रस्थापित करण्याचे लक्ष्य साध्य करू असेही ते म्हणाले. कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर राज्यातील परिस्थिती झपाट्याने सुधारेल, असेही ते म्हणाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या