तरुणीवर बलात्कार केल्याबद्दल शिमल्यात कर्नलला अटक

42
सामना ऑनलाईन । शिमला 

शिमला येथील लष्कराच्या ट्रेनिंग कमांडमधील हिंदुस्थानी लष्कराच्या कर्नलला एका तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही तरुणी लेफ्टनंट कर्नलची मुलगी असल्याचं तपासात उघडकीस आलं आहे. कर्नल आणि त्याच्या एका साथीदाराने या तरुणीवर बलात्कार केला. कर्नलचा मित्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

१९ नोव्हेंबर रोजी कर्नल पिडीत तरुणी आणि तिचे वडील असे तिघेजण रात्रीच्या वेळी जेवणाच्या निमित्ताने एकत्र भेटले होते. गप्पा सुरु असताना या तरुणीने आपल्याला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं असल्याचं बोलून दाखवलं. याच गोष्टीचा फायदा घेत कर्नलने तिला आमीषं दाखवायला सुरूवात केली होती. त्याने त्याच्या मुलीसोबत मुंबईला राहा आणि तुझे फोटो मला पाठव असा सल्ला या तरुणीला दिली होता.

कर्नलने सांगितल्यानुसार या तरुणीने तिचे फोटो व्हॉटसअॅपवर पाठवले होते. फोटो पाहिल्यानंतर या कर्नले तरुणीला काहीवेळाने कॉल केला व मुंबईतील काही मॉडेल त्यांच्या घरी आल्याचे सांगून त्यांना भेटण्यासाठी तिला बोलावून घेतले. पि़डीत तरुणी कर्नलच्या घरी गेली असता तिथे कर्नल आणि त्याचा मित्र सोडून कोणीही नव्हतं. या दोघांनी तरुणीला जबरदस्तीने दारू पाजली आणि आळीपाळीने आपल्यावर बलात्कार केला अशी तक्रार तिने पोलिसांत दिली आहे. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यासतुझ्या वडिलांचे करिअर उध्वस्त करू अशी धमकी देखील दिली असंही तिने तक्रारीत म्हटलंय..

या तरुणीनीने घरी येऊन हा प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्यांनी ताबडतोब सिमला पोली स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदविली. पिडीत तरुणीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या