लष्कर आणि सरकारविरोधात पाकव्याप्त कश्मीरात घोषणाबाजी

17
फोटो-ANI

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकव्याप्त कश्मीरमध्ये लष्कराचा अत्याचार वाढत चालल्यानं स्थानिक लोक त्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. अनन्वित अत्याचार आणि जमीन बळकावल्यामुळे स्थानिक नागरिकानी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. पाकव्याप्त कश्मीरमधील कोटली भागामध्ये नागरिकांनी रस्त्यावर येत पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करत आहे.

नागरिकांच्या मनात पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या सरकारबाबत रोष आहे. त्यामुळे नागरिकांनी लष्कर आणि शरीफ यांच्या विरोधात रस्त्यावर येत घोषणाबाजी केली. पाकव्याप्त कश्मीरमध्ये याआधीही लष्कराच्या छळाविरोधात नागरिकांनी आंदोलनं केली आहेत. गेल्या काही वर्षात पाकिस्तानमध्ये मानवी अधिकाराच्या उल्लंघनाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्याविरोधात लोक रस्त्यावर उतरून निषेध नोंदवत आहेत.


याआधी पाकव्याप्त कश्मीरमध्ये २०१६ ला झालेल्या निवडणुकीत शरीफ यांनी फेरफार केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता. निवडणूकीचे निकाल आधीच निश्चित केले होते, निवडणुकीचा फक्त बनाव केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग या पक्षाने ४१ पैकी ३२ जागा जिंकल्या होत्या. तेव्हापासून आतापर्यंत पाकव्याप्त कश्मीरमध्ये सरकारविरोधात नाराजीचा सूर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या