जवानाचा रेल्वेतून पडून अपघाती मृत्यू

2324

सैन्यदलात कार्यकर्त असलेले पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र दगडवाडी येथील प्रवीण संपत शिंदे (33) यांचा सोमवारी रात्री जम्मूला रुजू होण्यासाठी जात असताना हरियाणा राज्यातील पानिपत शहराजवळ रेल्वेतून पडून अपघाती मृत्यू झाला.  या घटनेने दगडवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

 या बाबत अधिक माहिती अशी कि प्रवीण शिंदे हे  सुट्टी निमित काही दिवसांपुर्वी गावाकडे आले होते. सुट्टी संपल्यामुळे ते रविवारी रात्री नगर येथून रेल्वेने जम्मू कडे रवाना झाले.  हरियाणा राज्यातील पानिपत शहराजवळ मध्यरात्री रेल्वेतुन पडून शिंदे यांचा दुदैवी मृत्यू झाला.  मयत जवान प्रविण शिंदे यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुली , एक मुलगा , आई व वडील असा परिवार आहे. प्रवीण शिंदे यांचे थोरले बंधू कल्याण शिंदे हे सुद्धा सैन्यदलात कार्यरत आहेत. उद्या गुरूवार दि. 19 रोजी त्यांचा पार्थिवदेह दगडवाडी येथे आणण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या