जवानाने गरोदर बायकोला चालत्या गाडीतून ढकलले, गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशमध्ये एका जवानाने आपल्या गरोदर बायकोला चालत्या गाडीतून ढकलले आहे. नवरा बायकोची गाडीत भांडणे झाली. तेव्हा जवानाने रागाच्या भरात पत्नीला चालत्या गाडीतून ढकलून दिले.

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका जवानाची तैनाती होती. दोन वर्षापूर्वी जवानाचे एका महिलेसोबत लग्न झाले होते. दोघेही मूळचे राजस्थानचे रहिवासी आहेत. जवानाची बायको दिल्लीत सरकारी शाळेत शिक्षिका आहे.

जवानाची अरुणाचल प्रदेशमध्ये नव्याने तैनाती झाली होती. म्हणून त्याची पत्नी मेरठमध्ये त्याला भेटण्यासाठी आली होती. रविवारी पत्नी सासरी आली तेव्हा तिची सासू आणि दीरही उपस्थित होते. चौघेही आर्मी कॅन्टीनमध्ये वस्तू घेण्यासाठी निघाले. तेव्हा गाडीत नवरा बायकोची भांडणे झाली. जवानाने रागाच्या भरात आपल्या बायकोला चालत्या गाडीतून ढकलून दिले.

जखमी बायको कशीबशी पोलीस स्थानकात पोहोचली आणि आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. इतकेच नाही तर यापूर्वी आपण गरोदर असताना नवर्‍याने आपल्याला मारहाण केली, त्यामुळे आपला गर्भपात झाल्याचेही तिने सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पतीविरोधात सैन्यातही तक्रार करणार असल्याचे पत्नीने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या