एकावं ते नवलच….चक्क मळलेल्या पायांच्या फोटोंच्या विक्रीतून कमावले लाखो रुपये

लहान मुले पायात चप्पल न घालता फिरतात तेव्हा त्यांचे आईवडील त्यांच्यावर रागवतात. थंडीच्या दिवसांत तर मुलांना आवर्जून पायमोजे घातले जातात, यामुळे त्यांना ऊब मिळते, मात्र ब्रिटनमध्ये राहणारा एक तरुण वर्षभर अनवाणी फिरतोय आणि तेही घरातच नाही, तर घराबाहेर कोणत्याही ठिकाणी, हॉटेलमध्येसुद्धा तो असाच उघड्या पायांनी जातो. त्याच्या अशा वागण्याचे विचित्र कारण त्याने लोकांना सांगितले.

इंग्लंडमधील केंब्रिज येथे राहणारा जॉर्ज वुडविले (20) असे या तरुणाचे नाव आहे. सध्या तो राहात असलेल्या त्याच्या परिसरात अत्यंत प्रसिद्ध झाला आहे. सोशल मिडियावरही त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षी तो त्याची आई आणि आजोबांसोबत प्लायमाउथ येथे फिरायला गेला होता. हॉटेलच्या परिसरात फिरत असताना अचानक त्याच्या मनात विचार आला की, माणसाने पायात चप्पल घालणे गरजेचे आहे का? पायात चप्पल, बूट न घालताही तो सहजरित्या चालू, फिरू शकतो. जेव्हा तो हॉटेलमध्ये परतला तेव्हा त्याने त्याच्या मनात आलेल्या या वेगळ्याच विषयावर गुगलवर संशोधन करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याच्या एका ठिकाणी बेयरफूट मुव्हमेंट सुरू असून तिथे लोकं अनवाणी पायाने फिरत असल्याची माहिती मिळाली.

सुट्टी संपल्यावर घरी परतल्यानंतर त्यांने त्याच्याजवळील 20 बुटांचे जोड फेकून दिले आणि तो अनवाणी पायाने फिरू लागला. एक वर्षापासून जॉर्ज पायात चप्पल घालत नाही. सुरुवातीला त्याला ही सवय लावून घेण्याकरिता प्रचंड त्रास झाला, मात्र नंतर अनवाणी चालण्याची सवय लागली. बऱ्याच वेळा लोकं त्याच्या अनवाणी असण्याचा स्वीकार करत नाहीत. एकदा सुपरमार्केटमधील मॅनेजरने त्याला अनवाणी आलेले पाहिले, तेव्हा त्याने त्याला तात्काळ तिथून निघून जाण्यास सांगितले. लोकांना त्याला किळस येते, कारण बऱ्याच चप्पल न घातल्याने पाय अत्यंत मळलेले असतात. याकरिता तो प्रत्येक ठिकाणी जाताना पाय धुवूनच जातो, असे जॉर्ज सांगतो.

त्याच्या विचित्र वागण्याबाबात जॉर्जचे म्हणणे आहे की, थंडीच्या दिवसात त्याला अनवाणी चालण्याचा जास्त त्रास होतो, मात्र काही दिवसांतच त्याला सवय झाली. आश्चर्य म्हणजे आता सोशल मिडियावरही त्याचे फॅन वाढत आहेत. जॉर्जने ओन्लीफॅन्स या सबस्क्रिप्शन साइटवर त्याचे अकाउंट तयार करण्याचा केले आहे. यावर तो त्याच्या मळलेल्या पायांचे फोटो विकतो. पहिल्याच महिन्यात त्याने 9 हजार रुपये कमवले असून यापुढेही त्याला आशा आहे की, त्याच्या पायाचे मळलेले फोटो विकून तो लवकरच 1 लाख रुपये कमवेल.