शहला रशीद यांच्या अटकेची मागणी

414

जम्मूकश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर केंद्राने कश्मीरमध्ये कर्फ्यु लावला होता. या दरम्यान जेएनयूच्या माजी विद्यार्थी नेत्या शहला रशीद यांनी हिंदुस्थानी लष्कराबाबत आक्षेपार्ह ट्विट करत त्यांच्याकडू खोऱ्यातील लोकांचा शारीरिक मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप केला.

मात्र, या ट्विटमध्ये काहीच तथ्य नव्हते. त्यामुळे रशीद यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे आलोक श्रीवास्तव या वकिलाने केली आहे. रशीद खोटे बोलून लोकांची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी केल्यामुळे त्यांना तात्काळ अटक केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, लष्करानेही रशीद यांच्या आरोपांचे खंडन केले असून हे सगळे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. रशीद या कश्मिरी असून त्या श्रीनगरमध्ये राहतात.

आपली प्रतिक्रिया द्या