
युक्रेन युद्धाप्रकरणी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. युद्धाच्या वर्षभराच्या काळात जबरदस्तीने बालकांचे आणि नागरिकांचे यूव्रेनमधून रशियाला स्थलांतर केल्याचा ठपका पुतीन यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी रशियाच्या इतर अधिकाऱयांना देखील वॉरंट जारी करण्यात आले आहे. रशियाने केलेल्या आक्रमणासंदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टाचे न्यायाच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल असल्याची प्रतिक्रीया यूव्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली आहे.