हर्षा भोगले पुन्हा समालोचन करणार

31

सामना ऑनलाईन – नवी दिल्ली

क्रिकेटच्या मैदानावर फलंदाज जितकी फटकेबाजी करतो तितकीच मैदानाबाहेर क्रिकेट समालोचक करत असतो. हिंदुस्थानी क्रिकेटचा आवाज म्हणून ओळख असणारे समालोचक हर्षा भोगले पुन्हा एकदा क्रिकेट समालोचन करताना दिसणार आहेत. आयपीएलच्या १०व्या सत्रामध्ये हर्षा भोगले समालोचन करताना दिसण्याची शक्यता आहे. मात्र त्यांना मैदानाऐवजी स्टुडिओत बसुन समालोचन करावं लागणार आहे. साधारण १ वर्षांपूर्वी बीसीसीआयनं त्यांना समालोचकाच्या पदावरून काढून टाकलं होतं.

काय होतं प्रकरण?

२०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध मुरली विजयनं शतक ठोकले होते. त्यानंतर समालोचक हर्षा भोगले यांनी विजयला फलंदाजीवर विचित्र प्रश्न विचारले होते. तर २०१४ ला झालेल्या २०-२० षटकांच्या विश्वचषकात विराटनं केलेल्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

याबाबत विराट कोहली आणि विजयनं बीसीसीआयकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीवर कारवाई करत बीसीसीआयनं हर्षा भोगले यांना काढून टाकलं होतं. हर्षा भोगले यांनी केलेल्या वक्तव्यावर अमिताभ बच्चन यांनी देखील ट्वीट करत नाराजी व्यक्त केली होती. अमिताभ यांचं ट्वीट हिंदुस्थानी खेळाडू एम.एस. धोणीनं भोगले यांच्याविषयी रि-ट्वीट करत नाराजी दर्शवली होती.

amitabh-tweet

आपली प्रतिक्रिया द्या