अनोखे कलाप्रदर्शन

सुप्रसिद्ध कॅलीग्राफर अच्युत पालव आणि अरेबिक लिपीतील कलाकार सल्का रसूल यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन वरळीच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत ६ ते १२ फेब्रुवारीदरम्यान भरणार आहे. ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ असे नाव असलेल्या या कलाप्रदर्शनात या दोघांनी माणसा माणसांतील दरी कमी करण्याचे काम आपल्या रेखाटनातून साकारले आहे.

हे दोघेही कलावंत वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरील… पण त्यांना संदेश एकच द्यायचा आहे आणि तो आहे शांती, प्रेम आणि सर्कात महत्वाचे म्हणजे मानवतेचा. भाषेची लिपी वापरत आणि त्याला हृदयाला भिडणाऱ्या संकल्पनांची जोड देत हे कलाकार या कलाकृती साकारतात. हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले राहील.

आपली प्रतिक्रिया द्या