मुंबई सफारी :- आर्ट गॅलरी

118

सामना ऑनलाईन । मुंबई
घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना वेळ मिळतो तो सुट्टीच्या दिवसांत. तेच ते रस्ते, माणसे, सततची गर्दी बघून कंटाळलेला मुंबईकर मग वीकेण्डचं निमित्त साधून मुंबई बाहेर पडायचा प्लॅन आखतो. पण, आपल्या मुंबईत अशी भरपूर ठिकाणं आहेत, जिथे तुम्ही फिरता फिरता सहज भरपूर माहिती मिळवू शकता. चला तर आपणही मुंबईतली कलेची साठवण करणाऱ्या आर्ट गॅलरींविषयी जाणून घेऊया.

‘मुंबईतील आर्ट गॅलरी ’

१)नॅशनल आर्ट गॅलरी
हिंदुस्थानी संस्कृतीला जगभरात स्थान मिळवून देण्यासाठी १९६६ साली नॅशनल आर्ट गॅलरी सुरू करण्यात आली. ही गॅलरी फोर्टजवळ असून तिथे राजा रवी वर्मा यांसारख्या बड्या कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शनास ठेवल्या जातात.

national-gallery-of-modern

२)जहांगीर आर्ट गॅलरी
१९५२ साली सुरू झालेली ही गॅलरी काळा घोडा येथे आहे. प्रतिष्ठीत आणि आधुनिक असलेल्या या गॅलरीत प्रदर्शनाचे चार हॉल आहेत.

jahangir_art_gallery

३)केमोल्ड गॅलरी
केमोल्ड प्रेस्कॉट रोड असे या गॅलरीचे नाव असून ती मुंबईतील सर्वात जुनी व सर्वोत्कृष्ट आर्ट गॅलरी आहे. १९६३ साली सुरू झालेली ही गॅलरी फोर्टजवळ आहे. शिल्पा गुप्ता, धुर्वी आचार्य, यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांच्या कलाकृती तुम्हाला येथे जरुर पाहायला मिळतील.

chemould-artgallery

४)वॉल्ट आर्ट गॅलरी
२००९ साली सुरू केलली ही गॅलरी कुलाबा येथे असून काही दिवसातच आकर्षणाचा विषय बनली आहे. रणबीर कलेक यांच्या काही पेटींग्स व व्हिडिओ तुम्हाला येथे पाहायला मिळतील.

volte_gallery_mumbai

मुंबई सफारी :-गार्डन पार्क

५)प्रोजेक्ट ८८
ही आर्ट गॅलरी कुलाबा येथे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या कलावंतांची चित्र आणि शिल्पाकृती तुम्ही येथे पाहू शकाल.

project88

६)मिरचंदानी आणि स्टीनरुएके आर्ट गॅलरी
आंतरराष्टीय पातळीवर नावजलेले कलावंत उषा मिरचंदानी व रंजना स्टीनरुएके यांनी सुरू केलेली ही आर्ट गॅलरी ताज हॉटेलच्या जवळच आहे. मुंबईतील कलाकारांच्या पेटिंग्ससह आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या कलाकृतीदेखील येथे प्रदर्शनासाठी ठेवल्या जातात.

mirchandani-gallery

७) गिल्ड आर्ट गॅलरी
१९९७ ला सुरु झालेल्या या गॅलरीत नवीन उभारी घेणाऱ्या कलाकारांना विविध प्रयोग करण्याची संधी दिली जाते. याशिवाय तिथे प्रदर्शनासह चित्रपटाच्या स्क्रीनिंगही करण्यात येतात.

giled-gallery

८) मस्करा गॅलरी
२००८ साली सुरू करण्यात आलेली ही गॅलरी जगभरातील कलाकारांना एकत्र आणते.

maskara-gallery

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील आपल्या पसंतीच्या आर्ट गॅलरींची माहिती आम्हाला नक्की कळवा. खाली दिलेल्या प्रतिक्रियेच्या बॉक्समध्ये टाइप करुन ही माहिती तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता.

आपली प्रतिक्रिया द्या